“लॉकडाउन” न करता या दक्षिण कोरियाने दिलाय कोरोनाशी सामना (South Korea fight against Covid-19)
सध्या तरी जगात फक्त कोरोनाचाचं बोलबाला झालेला आहे. भारतात तर लॉक डाऊन तर झालंच आहे. लॉक डाऊन न केल्याचे तसेच सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याचे परिणाम आधी इटली आणि आता अमेरिका भोगत आहेत.आपल्या मुत्सद्दी निर्णयाने देश बंद न करता दक्षिण कोरियाने हे संकट बऱ्यापैकी कंट्रोल मध्ये आणलं आहे.
जस आपण भारतात बघितलं की, फेब्रुवारी मध्ये जेव्हा एक केस दाखल झाली तसं दिवसेंदिवस कोरोनाच्या केसेस वाढत गेल्या आणि बघता बघता ५० दिवसात आज १००० च्या घरात ही संख्या आली.
दक्षिण कोरियात पहिल्या दिवशी संक्रमणाच्या १० केसेस दाखल झाल्या, तोच दहाव्या दिवशी पण केसेसचा रेट हा १०चं होता. विसाव्या दिवशी सुद्धा दहाच. इन्फेक्शन न वाढत होतं ना कमी होत होतं. याचाच अर्थ असा की, दक्षिण कोरिया मध्ये इन्फेक्शन आणि दिवस यांचा आलेख हा फ्लॅट म्हणजेच सरळ रेषेत आहेत.
दक्षिण कोरिया न हे शक्य कसं झालं ते पाहूया.
जशी पहिली केस दाखल झाली तशी दक्षिण कोरियाची सरकारी यंत्रणा जागी झाली आणि जवळपास सगळ्या कोरियन फार्मा कंपनीशी त्यांनी मीटिंग चालू केल्या.
लाखोंच्या घरात टेस्टिंग किट तयार करून संपूर्ण दक्षिण कोरियाच्या विविध भागात ते पाठवण्यात आले. जनतेला टेस्ट कॅम्पलसरी करण्यात आली. लहानातला लहान असो वो वृध्दातला वृद्ध सगळ्यांनाच.दायगु. चर्चच्या माध्यमातून इथे संसर्ग झालेला. हे चर्च बंद करण्यात आलं. प्रत्येक मोक्याच्या ठिकाणी टेस्टिंग सुरू झाली. ही तपासणी थक्क करणारी आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या मते, दक्षिण कोरियाने ट्रान्समिशन फेज मध्ये सर्वाधिक टेस्ट केल्या. जवळपास तीन लाखाच्या घरात त्यांनी जनतेच्या टेस्ट केल्या. तपासणीला त्यांनी केंद्रस्थानी ठेवले त्यामुळे संक्रमित रुग्णांची माहिती लवकर मिळू शकली. जे रुग्ण सापडले त्यांना तत्काळ आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आलं. हॉस्पिटल आणि टेस्टिंग लॅब ला यापासून लांब ठेवायचं होत. यावर पण त्यांनी उपाय काढले. चालते फिरते ६०० लॅब त्यांनी सुरू केले. रस्त्यावर गाडी अडवून लोकांच्या टेस्ट केल्या जाऊ लागल्या. ताप आहे का, सर्दी, खोकला अशी काही लक्षण दिसली की त्वरित त्यांचे सॅम्पल घेऊन ते तात्काळ फोन बुथ सारख्या चौकाचौकात तयार केलेल्या लॅब मध्ये पाठवले जाऊ लागले. सार्वजनिक ठिकाणी फिरताना काळजी घ्या सांगण्यात आलं. जवळपास सर्व सार्वजनिक ठिकाणी कोरोना संबंधित घ्यावयाची काळजी प्रसारित करण्यात येत होती. आणि हे सगळं फळाला आलं. जनतेने योग्य खबरदारी घेऊन सुरक्षेची कमान आपल्या हातात घेतली. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात संक्रमणाला चाप बसला. लोकांनी प्रवास केला असेल तर तिथल्या सगळ्या लोकांना आयसोलेट केलं जाऊ लागलं. ज्या मार्केट मध्ये खरेदी केली तिथल्या लोकांना टेस्ट साठी संपर्क करण्यात येऊ लागला. ज्या भागात ती व्यक्ती राहायची, तिथे सगळ्यांना गाईडलाईन्स फॉलो करायला भर लावला. याचा परिणाम असा झाला की, लोकांना घरच्या घरी ट्रीटमेंट मिळायला लागली आणि जर जास्तच गंभीर केस असेल तर त्यासाठी हॉस्पिटलमध्ये जागा मिळू लागली. जिथे पाचशे-हजाराच्या घरात कोरोनामुळे लोकांचे जीव जात होते, तिथे दक्षिण कोरियाने कोरोनामुळे सर्वाधिक कमी मृत्यूदराचा रेकॉर्ड केला.
या सगळ्याचा फायदा असा की दक्षिण कोरियाचे रेडिमेड किट १७ देशांमध्ये पोहोचले. वर्ड हेल्थ ऑर्गनायझेशन तर तोंडभरून दक्षिण कोरियाचे कौतुक केले.
