२५ लक्ष करोंड चे पॅकेज जाहीर झाल्यानंतर MSME बाबत चुकीची माहिती
नुकतेच आपले मा. प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी कोरोना लढाईत आर्थिक स्थिरता रहावी. तसेच उद्योगधंदे यांना चालना मिळावी यासाठी काही दिवसापूर्वी लॉक डाऊन ४ च्या आधी भारतीय जनतेला संभोदीत २५ लक्ष करोंड चे पॅकेज जाहीर केले होते. त्यानंतर दोन दिवसांनी सदर पॅकेजच्या माहितीचे मा. अर्थमंत्री सीता रमन यांनी विश्लेषण केले. मग काय नंतर भारतीय जनतेतील उद्योग धंदे करणारे व करण्यास उत्सुक असणारे यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. पॅकेज विश्लेषणात नमूद एम. एस. एम. ई. नोंदणी (M.S.M.E.) म्हणजे “उद्योग आधार” यावर नोंदणी असलेल्या उद्योगाना पॅकेज चा लाभ होईल. अशी माहिती कळताच त्यावर ज्या उद्योगांची नोंदणी त्यावर नाही अशांनी नोंदणी साठी धडपड करायला सुरुवात केली. त्याच बरोबर काही सायबर चालवणाऱ्या दुकानदारांनी तर या लोकांची दिशाभूल करत. ही नोंदणी काहीच दिवस आहे, तसेच ऑनलाइन इंटरनेट वर काहीनी तर थेट वेबसाइट करून ऑनलाइन पैशाची मागणी करून नोंदणी करून मिळेल या प्रकारे पैसे कामावण्याची देखील शक्कल लढवली. या सर्व गोष्टी समोर आल्या व यांची शहा निशा करीत विचार केला की याबाबत लिहाव, सर्वात आधी लोकांनी याब...