कोरोना व्हायरस Covid-19 (Corona) विरुद्ध स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण कसे करावे...
कोरोना व्हायरस विरुद्ध स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण कसे करावे... या गोष्टींचे अनुसरण करा:- वारंवार हात धुण्याचा सराव करा. साबण आणि पाण्याने हात धुवा किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटाइजर चा वापर करा. हात स्वच्छ असले तरीही धुवा. शिंका येत असताना आणि खोकला येत असताना आपले नाक आणि तोंड रुमाल / टिशूने झाकून ठेवा. वापरलेल्या टिश्यू लगेच बंद झाकणाच्या बिन मध्ये फेका. त्याचा पुन: वापर नाही होणार यांची काळजी घ्या. आपल्याला अस्वस्थ (ताप, श्वासोच्छ्वास आणि खोकला) वाटत असल्यास डॉक्टरांना भेटा. डॉक्टरां कडे भेट देताना आपले तोंड आणि नाक झाकण्यासाठी मास्क / कपडा यांचा वापर करा. आपल्याला वरील चिन्हे / लक्षणे असल्यास वर राज्य हेल्पलाइन क्रमांकावर किंवा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या 24x7 हेल्पलाइनवर 011-23978046 कॉल करा. मोठ्या संमेलनात भाग घेऊ नका. या गोष्टींचे अनुसरण करु नका:- जर आपल्याला खोकला आणि ताप येत असेल तर कोणाशीही संपर्क करणे. आपले डोळे, नाक आणि तोंड स्पर्श करणे. सार्वजनिकपणे थुंकणे.