सद्यस्थितीत लहान मुलांची वागणूक आणि त्यातून त्यांची सुटका
माझे सर आहेत त्यांच्या “मोकळे बोला” या हॅशटॅग ने आलेला लेख वाचुन खरंच या गोष्टी आहेत की आपण सहज करतो पं त्याचे परिणाम के असतील याचा विचार आपण करीत नाही. जे की आपण केले पाहिजे. कारण आज आपण पाहतो की भूतकाळाच्या तुलनेत मुले टीव्ही पाहण्यात जास्त वेळ घालवत आहेत. हा सकारात्मक बदल आहे की नकारात्मक बदल ? येथे उत्तर असे असू शकते की आमच्या काळात तंत्रज्ञान जास्त प्रगत नव्हते. तसेच गेमिंग उद्योगातील प्रगती ही होण्याचे एक कारण आहे. त्याचप्रमाणे ग्राफिक्स , अॅनिमेशन मुलांना खूप आकर्षित करतात. यासर्व आकर्षणाच्या बाजू झाल्यात की लहान मूल आज याकडे कशामुळे वळतात. आणि सतत मोबाइल, कम्प्युटर वा टीव्ही पाहण्याकडे का त्यांचा कल का आहे. यात आम्हाला असे आढळले आहे की घरातील खेळ वाढत आहेत आणि मैदानी क्रिया कमी होत आहेत. याला सद्यस्थिती (कोव्हिड-१९) ही पण आहेच. परंतू याआधीही यात काही वेगळे होते असे तरी आम्हाला वाटत नाही फक्त थोडी कोव्हिड चि भर झाली एवडच नाही का? एक मुद्दा असा ही आहे की पालक म्हणून आपण आपल्या मुलांचे भविष्य घडविण्यास जबाबदार आहोत. पण यात...