गुगलने प्ले स्टोअर वरील ८१३ ‘धोकादायक’ अॅप्स काढून टाकल्या, तुम्हीही त्वरित हटवा
गुगलने
प्ले स्टोअर वरून शेकडो क्रीपवेअर अॅप्स
काढल्या ज्यांनी लोकांची हेरगिरी केली आणि त्यांचे बळी बनविले. गुगलने अशा ८१३ अॅप्सवर
बंदी घातलेली आहे.
गुगलने
त्यांच्या प्ले स्टोअरमधून आतापर्यंत शेकडो संशयास्पद अॅप्स काढल्या. प्ले स्टोर वर
अशा भरपूर अॅप्स आहेत ज्या लोकांना हेरगिरी करण्यासाठी मदत करतात किंवा त्या मुळात
त्यासाठीच तयार करण्यात आलेल्या असतात. आणि अशा अॅप्स या बऱ्याच लोकांना हेरगिरी करून
बळी बनवतात. अशा अॅप्सना क्रिपवेयर (Creepware) म्हणतात. आशा अॅप्स
डाउनलोड
केलेल्या अनेक लाखो लोकांच्या मोबाइल मध्ये आहेत आणि या अॅप्सचा वापर ते आजही करत
आहेत याचाच फायदा हॅकर्सनी घेऊन बरीच हेरगिरी केलेली आहे आणि करता आहेत. असा अहवाल
गूगलने तयार केलेला आहे आणि यांचा अहवालानुसार गुगलने अशा ८१३ अॅप्सवर बंदी घातली
आहे.
यासर्व
गोष्टीत एक नवीन शब्द आपल्या समोर येतो तो म्हणजे क्रिपवेयर अॅप्स (Creepware
Apps) नेमके क्रिपवेयर अॅप्स आहे तरी काय?
क्रिपवेयर
अॅप्स असे असतात जे हॅकर्स एखाद्या व्यक्तीची टेहळणी करण्यासाठी,
धमकी देण्यासाठी किंवा फसवणूकीसाठी वापरतात. आणि त्यांच्यामार्फत
हॅकर्स आपल्या ऑनलाइन क्रिया यावर नजर ठेऊन त्याचा मागोवा ठेवतात आणि आपला
संकेतशब्द देखील चोरी करण्यावर त्यांची मजल जाते. मग यानंतर काय, हॅकर हे अॅप्स मार्फत मिळालेल्या माहितीचा दुरुपयोग करतात.
पण
ही अॅप्स अशा प्रकारे कार्य करतात.
समजा,
एखाद्याने असे अॅप डाउनलोड केले, जेव्हा ते आपण वापरायला सुरुवात करतो तेव्हा ते अॅप्स
आपल्याला काही परवानगी (Permission) मागतात.
जस की फोन कॉल ची माहिती वाचने, फोन डायरी वाचने, मेसेज वाचने, कॅमेरा ओपन करणे इ.
मग यामुळे हॉट काय आपण मागितलेली परवानगी ला हो करताच हॅकर्स त्यांच्या फोन फायली,
मेसेजेस आणि कॅमेरे इत्यादींमध्ये प्रवेश मिळवतात. सायबर सिक्युरिटी
फॉर्म नॉर्टनच्या म्हणण्यानुसार “क्रीपवेअरच्या माध्यमातून
हॅकर्स तुमच्या संगणकावर किंवा मोबाईल डिव्हाइसवर बसून नियंत्रण ठेवतात.” ते आपल्या डिव्हाइसच्या कॅमेरा आणि मायक्रोफोनद्वारे आपल्याला पाहण्यात
आणि ऐकण्यात सक्षम आहेत.
संशोधकांना
असे १०९५ अॅप्स सापडले आहेत, जे २०१७ ते
२०१९ दरम्यान १ दशलक्षाहून ही जास्त वेळा डाउनलोड केल्या गेल्या.
तरी
यावरून अशा ज्या अॅप्स असतील की ज्या सध्या तुमच्या मोबाइलमध्ये आहेत त्यांना लवकर
हटवा म्हणजे अनइंस्टॉल करा.
