वारकरी संप्रदायातील अभंग, किर्तन म्हणजे काय??

abhang-kirtan

जय जय राम कृष्ण हरी... आज आपण या ठिकाणी वारकरी संप्रदायातील किर्तनाचे महत्व, किर्तन म्हणजे काय? याबाबत विचार करणार आहोत. 

संत ज्ञानेश्वर महाराज यांचे अभंगावर किर्तन करणे म्हणजे सुप्रीम कोर्टात अपील करण्यासारखे आहे. किर्तन म्हणजे शारदेच लावण्य रूप भांडार आहे. ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे आदी शक्ती मुक्ताई म्हणाल्या म्हणून आज तुम्हा-आम्हाला ज्ञानेश्वरीहरिपाठताटीचे अभंग, अमृतानुभव या साहित्याचा लाभ झाला. 

 

किर्तन म्हणजे ज्ञानभक्ती, आनंद यासाठी भगवंताने निर्माण केलेला उपाय, कार्य होय. हे कार्य भगवंताने संतांकडून करून घेतले आहे. म्हणूनच संतांची महाराष्ट्रावर कृपा आहे कारण संतांचा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे. किर्तन रुपी ग्रंथ जे संतांकडून रचले गेले ते प्राकृत मराठी भाषेत आहेत. आपल्याला माहीत असेल जगामध्ये एकूण बोलल्या जाणाऱ्या भाषा आठ हजार आहेत. त्यात प्रामुख्याने मराठी भाषेचा क्रमांक सतरावा येतो. 

अंतकरणाचा भेद घालवण म्हणजे किर्तन 

देवाचा परिचय भक्तीमुळे होतो. संतांचा परिचय लक्षणामुळे होतो व माणसाचा परिचय त्याच्या बोलण्याने किंवा सदगुणामुळे होतो. याचा अर्थ असा की यामुळे देव कळेल पण संत कळणार नाही. देवाने जीव दिला पण संतांनी शिकविले ते, चांगले बोलणे, मार्गदर्शन वाचा सिद्ध होणे, खोट न बोलणे.

जोग महाराजमामा दांडेकर महाराज यांची कृपा की यांनी कीर्तन सेवा अविरत सुरू राहावी म्हणून वारकरी शिक्षण संस्था १९१७ साली सुरू केली आणि म्हणून आजही आपण किर्तन ऐकू शकत आहोत. व संतांचे विचार, शिकवण, धर्म आत्मसात करू शकत आहोत.

वारकरी संप्रदायात अशी शिकवण आहे की, संसार जरूर करा पण संसार करीत असताना परमार्थ पण करा व त्यास वेळ द्या. मी आणि माझे हे सोडणे म्हणजे सन्यास होय. म्हणजे परमार्थ करण्यासाठी सर्व सोडून संन्यासी जाणे असे नाही. परमार्थ हा तुम्हाला संसारात असताना देखील करता येतो. 

जसे की १०० एकर शेतीची वाटणी केली असता उतरत उतरत काहीच शिल्लक राहत नाही. पण शत कोटी अभंगावर दररोज पूर्ण महाराष्ट्रात एक कोटी खर्च होतो. त्या खर्चाची (अभंगांची) वाटणी सर्व किर्तन कार करतात. जसे की कीर्तनकार यांना कीर्तन आणि अभंग करण्याकरिता संतांच्या अभंगांची साथ आहे. संतांच्या अभंगामुळे कीर्तनकार आज महाराष्ट्रात कीर्तन सेवेसाठी आजही उभे आहेत. 

अभंगांची गाथा ज्यांच्या माथ्यास लागली त्यांचा माथा प्रकाशीत झाला आहे, आणि तसेच त्यांना ज्ञान व प्रवृत्तीतून निवृत्त होतो.