सद्यस्थितीत लहान मुलांची वागणूक आणि त्यातून त्यांची सुटका
माझे सर आहेत त्यांच्या
“मोकळे बोला” या हॅशटॅग ने आलेला लेख वाचुन खरंच या गोष्टी आहेत की आपण सहज करतो पं
त्याचे परिणाम के असतील याचा विचार आपण करीत नाही. जे की आपण केले पाहिजे. कारण आज
आपण पाहतो की भूतकाळाच्या तुलनेत मुले टीव्ही पाहण्यात जास्त वेळ घालवत आहेत.
हा सकारात्मक बदल
आहे की नकारात्मक बदल?
येथे उत्तर असे असू
शकते की आमच्या काळात तंत्रज्ञान जास्त प्रगत नव्हते. तसेच गेमिंग उद्योगातील
प्रगती ही होण्याचे एक कारण आहे. त्याचप्रमाणे ग्राफिक्स, अॅनिमेशन मुलांना खूप आकर्षित करतात. यासर्व आकर्षणाच्या
बाजू झाल्यात की लहान मूल आज याकडे कशामुळे वळतात. आणि सतत मोबाइल, कम्प्युटर वा टीव्ही
पाहण्याकडे का त्यांचा कल का आहे.
यात आम्हाला असे
आढळले आहे की घरातील खेळ वाढत आहेत आणि मैदानी क्रिया कमी होत आहेत. याला सद्यस्थिती
(कोव्हिड-१९) ही पण आहेच. परंतू याआधीही यात काही वेगळे होते असे तरी आम्हाला वाटत
नाही फक्त थोडी कोव्हिड चि भर झाली एवडच नाही का?
एक मुद्दा असा ही आहे
की पालक म्हणून आपण आपल्या मुलांचे भविष्य घडविण्यास जबाबदार आहोत. पण यात अशी वेळ आहे की पालक आपल्या मुलांना
टीव्ही किंवा व्हिडिओ गेम्सचा आनंद घेण्यास नकार देऊ शकत नाहीत. परंतु याठिकाणी कठोर
वेळेची अंमलबजावणी केली पाहिजे म्हणजे जेथे मुले गॅझेट्स हे ठरवून दिलेल्या वेळेसाठीच
वापरू शकतात.
मुलाला व्हिडीओ
गेम्स किंवा टीव्हीकडे व्यसन लागत नाही याची तपासणी पालकांनी करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत
नाही पण लॉकडाऊन संपल्यानंतर उत्तम मार्ग म्हणजे मैदानी खेळ त्यासाठी मुलांना प्रेरित करणे. कारण मैदानी खेळ
हे बऱ्याच मुलांमध्ये राहून खेळली जातात त्याचबरोबर बाहेर खेळत असल्याने त्यांच्या
शारीरिक हालचाली होतात याचा फायदा म्हणजे मूल ही शारीरिक, भावनिक आणि मानसिकदृष्ट्या बळकट राहतील.
